बोरिवलीकरांच्या सोयीसाठी आमदार संजय उपाध्याय यांच्या माध्यमातून एकूण ५५ बसेस विनामूल्य गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी आज सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास १६ बसेसना बोरिवली ते कोकण मार्गस्थ करण्यात आले. या वेळी उपस्थितांशी संवाद साधून कोकणवासीयांना आणि गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संजय उपाध्याय यांच्या पत्नी नीलम उपाध्याय, भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.