यंदाही महाराष्ट्रातील ह्या छोट्याशा गावात पडला देशातील सर्वाधिक पाऊस रेकॉर्ड कायम.. एकेकाळी देशात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने मागे टाकले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या पाथरपुंजने यावर्षीच्या पर्जन्यमानात चेरापुंजीवर मात केली आहे. इतकेच नव्हे, तर राज्यातील अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोयना, नवजा, महाबळेश्वर आणि वलवण या ठिकाणांनाही मागे टाकत पाथरपुंज पावसाचे नवे 'माहेरघ