गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला या गजरात शनिवार दि. 6 सप्टेंबरला सायं. 6 वाजता पासून रात्रीपर्यंत रामटेक शहरात अनंत चतुर्थीला स्थापीत गणरायांचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. शहराचा प्रत्येक मुख्य रस्ता, गल्लीबोळातून घरगुती गणेश मुर्त्या विसर्जनासाठी निघाल्या. काहींनी डोक्यावर घेत तर काहींनी हात ठेला, दुचाकी, कार मध्ये गणेशजींच्या मुर्त्या शहरातील राखी तलाव, रामाळेश्वर मंदिर तलाव,गाव तलाव परिसरात न.प. द्वारे निर्मित टॅंक मध्ये विसर्जित केल्या.