बृहन्मुंबई महानगरपालिका शाळामंधील विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक दृष्टिने टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते आज महानगरपालिका मुख्यालयात झाले. अशी माहिती सोमवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ.अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, उपशिक्षणाधिकारी मुख्तार शाह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.