जवळा पळशी ते नरसी नामदेव रस्त्यावरील पुलाचे काम सुरू पावसामुळे पर्यायी पुलाजवळील रस्ता वाहून गेल्याने संत नामदेव महाराज मंदिराकडे येणाऱ्या भाविकांची होत आहे गैरसोय संत नामदेव महाराज मंदिराजवळील कयाधू नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे मान्सूनपूर्व पावसाने या पुलाचे कामात अडथळा निर्माण झाला आहे नदीला पूर गेल्याने येथील पर्यायी रस्ता तुटून गेला आहे यामुळे नरसीकडे येणारे भाविक तसेच नागरिक यांना आता पर्यायी रस्ता म्हणून गिलोरी मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याची माहिती दिनांक २५ प्राप्त झाली