जि.प. व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचलपूर तालुक्यात मनसेच्या आढावा बैठकीला गती मिळाली आहे. नुकतीच शिंदी जिल्हा परिषद सर्कलमधील काकडा येथे बैठक पार पडली. ही बैठक तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या वेळी जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. पुरुषोत्तम काळे म्हणाले की, तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून नियोजनबद्ध तयारी सुरू असून कार्यक