धुळे तालुक्यातील आर्वी गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्वी येथील एका महाविद्यालयात बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यावरून झालेला क्षुल्लक वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. काही संतप्त पालकांनी स्थानिकांना सोबत घेऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि मालमत्तेची तोडफोड केली. हा सर्व संतापजनक प्रकार महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेमुळे गावात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.