पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील टेटवली परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छपरे पत्रे उडून गेले असून नागरिकांचे नुकसान झाले आहे. राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी टेटवली परिसरात भेट देत नुकसानीची पाहणी केली. लवकरात लवकर मदत देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, तहसिलदार संबंधित अधिकारी उपस्थित होते.