मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज गुरुवार, 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले. यावेळी समाज बांधवांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, अशी जोरदार मागणी केली. आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव सहभागी होणार असून, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.