आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी अमरावती शहरातील खापर्डे बगीचा येथील विदर्भाचा राजा या श्री गणेशाला आज भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे आज श्री गणरायाचे विसर्जन होणार असून अमरावती शहरातील हा शेवटचा गणपती आहे जे विसर्जन आज होत आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी चौकाचौकात लावण्यात आला आहे अचानक आलेल्या वादळी पावसामुळे राजाच्या मिरवणूकला थोडा वेळ झाला आहे मात्र मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे विदर्भातून मोठ्या प्रमाणात भक्त अमरावती शहरात पोहोचले आहे.