आज दिनांक 22 ऑगस्ट ला नेर तालुक्यामध्ये सर्वत्र बैलपोळा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे सर्व शेतकऱ्यांचा जीवभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे.त्यानिमित्य आज नेर तालुक्यामध्ये सर्वत्र मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला....