कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास मराठा आरक्षणाबाबत मराठा उपसमितीची बैठक सुरू झाली. गिरीश महाजन, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांच्यासह प्रमुख नेते प्रत्यक्ष उपस्थित होते, तर शंभूराज देसाई, दादा भुसे आणि उदय सामंत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ऑनलाइन सामील झाले.