भुसावळ शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त “एक दुर्वा समर्पण” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि सायकल वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत १८७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तर १० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.