रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम ते कोतवडे जाणार्या रस्त्यावर पादचारी वृध्दाला अज्ञात दुचाकीची धडक बसून अपघात झाला. अपघातातील जखमी वृध्दाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची ही घटाना शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.15 वा.सुमारास घडली. श्रीकृष्ण सोनू मोरे (65, रा. दांडेआडोम मांडवकरवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा रविंद्र कृष्णा मोरे (45,रा.दांडेआडोम मांडवकरवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली