आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान बाम्हणी येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाम्हणी येथील शेतकऱ्यांनी आपले बैल सजवून पोळ्याच्या झडत्या मनात सर्जाराजा प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी गावकऱ्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या बैलांना धन्यवाद म्हणणारा हा सण गोंदियातील बाम्हणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.