आज दि ५ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील कळंकी गावात रानडुकरांनी शेतात मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. ऊस, कापूस, सोयाबीन यांसह हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी वनविभाग व प्रशासनाकडे तातडीने पंचनाम्यासह नुकसानभरपाईची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, रोजच्या हल्ल्यामुळे शेतीचे नुकसान वाढत चालले असून रानडुकरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.