यवतमाळ शहरातील शास्त्रीनगर परिसरातील दौलतराव घोडमारे यांच्यावर 9 सप्टेंबरला मोहन नामक आरोपीने वार करून जखमी केले होते. त्यानंतर आरडाओरड केल्याने मुलगा व परिसरातील नागरिक धावून आले तेव्हा आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता.याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती.यानंतर पोलीस कस्टडी संपल्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयामध्ये आरोपीला हजर केले असता त्याची रवानगी कारागृहांमध्ये करण्यात आली.