गजनीच्या मोहम्मदाने शतकापूर्वी उध्वस्त केलेल्या प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंग ची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे कारण त्याचे भग्न अवशेष अलीकडेच सापडले आहेत आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे या ज्योतिर्लिंगची प्रतिष्ठापना करणार आहेत, आज शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता साताऱ्यातील जलमंदिर येथे हे भग्न अवशेष आणण्यात आले असून खासदार उदयनराजे भोसले यांनी याचे दर्शन घेऊन पूजा केली यावेळी, संयोजकांनी या संदर्भात माहिती दिली.