कस्तुरबा नगर येथे एक अतिशय दूर्दैवी घटना घडली व त्यामध्ये यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. डॉ. हेमलता पाटील यांनी नागरिक व पिडीत नातेवाईक यांचे समवेत पोलीसांची भेट घेऊन चर्चा केली. पोलीसांनी पिडीत कुटुंबाची तक्रार नोंदवून घेतलेली आहे व या घटनेची सखोल चौकशी सुरू केलेली आहे. सर्व कस्तुरबा नगर वासियांना त्यांनी विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.