आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील नऊ गावांतून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी तब्बल 2 टन ठेचा-भाकर पाठविण्यात आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. जरांगे यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. मात्र मराठा आंदोलकांची होणारी खाण्याची आबाळ लक्षात घेऊन जालना तालुक्यातील धारकल्याण, नाव्हा, बोरखेडी, कडवंची, वडगाव, वखारी, पि