एनआयपीएचटीआरच्या सहकार्याने आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६.२६ मिनिटाच्या सुमारास रायगड सीजीएसटी आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी "बेसिक लाईफ सपोर्ट" या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी हृदय आणि श्वसनाच्या आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वाच्या कौशल्यांचा थेट सराव करण्यात आला.