कारंजा येथे विविध गणेश मंडळाचे गणेश उत्सव सुरू असून दिनांक 2 सप्टेंबर रोजी कारंजा शहरातील मंगलम मधील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे पारंपारिक वाद्याच्या गजरात टाळ मृदुंग सह सातव्या दिवशी आपल्या गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन केले. मिरवणुकीने संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. आजच्या डीजेच्या जमान्यात पारंपारिक वाद्य आणि टाळ मृदुंगाचे गजरात निघाली ही मिरवणूक आगळीवेगळी ठरली.