जीएसटी सुधारणांबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी दुपारी ४.३० च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. जीएसटीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी घेतलेला हा खूप मोठा निर्णय आहे. येणारी दिवाळी आपल्या सर्व देशवासीयांसाठी आनंदाने भरलेली असेल. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचेही अभिनंदन करतो. इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा लहान व्यापारी आणि लघु उद्योजकांनाही होईल. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल.