परंपरा संस्कृती आणि अनंदोत्सवाचा संगम घडवणारा भव्य तान्हा पोळा उत्सव आज दि.24 ऑगस्ट रोजी सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात शेकडो बालगोपाळांनी पारंपारिक वेशभूषेत नंदीबैलाची आकर्षक सजावट करून सहभाग नोंदविला बालगोपाळांचा उत्साही सहभागामुळे वातावरणात आनंदाने सांस्कृतिक रंग भरले कार्यक्रमाची सुरुवात पूजा अर्चना करून करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.