जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विभागांच्या प्रलंबित असलेल्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे सह आदी उपस्थित होते.