आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री अडीचच्या सुमारास ठाण्यातील गायमुख ते वडाळा मेट्रो मार्गाचा पहिला मेट्रो डबा आनंद नगर येथे यशस्वीपणे बसवण्यात आला आहे. या मार्गिकेवर ट्रायल रन सप्टेंबर मध्ये होणार आहे. मेट्रोचे 2 कोच या ठिकाणी बसविण्यात आले. सप्टेंबरमध्ये 10 रेल्वे स्थानकांमध्ये ट्रायल रन होणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यावर घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल.