रामटेक - मनसर मार्गावरील मनसर माईन पावर हाऊस स्टेशन समोरील जिमटोला वळणावर बुधवार दि. 24 सप्टेंबरच्या रात्री 10.30 वा.च्या दरम्यान पल्सर दुचाकीने मनसर वरून रामटेकडे येत असताना एका 14 वर्षीय मुलाचा दुचाकी अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकाला घासत जाऊन कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. मृतक मुलाचे नाव नुपूर प्रशांत वानखेडे वय 14 वर्षे रा. मनसर असे आहे. तर जखमी मुलाचे नाव गौरव बेहाडे वय 20 वर्षे रा. मनसर असे आहे. दि. 25 सप्टेंबरला शुभविच्छेदानंतर त्याचे शव परिजनाच्या हवाले करण्यात येणार आहे.