आर्णी शहरातील नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 1 या शाळेत समोरील पूर्ण प्रभागात पाण्याचा मोठा डबका साचला असून जणू शाळे समोरील प्रांगणात तळ्याचे स्वरूप आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये जा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे इथे पावसाळ्यात हीच परिस्थिती असून याची तक्रार ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी नगर परिषदेला 28 ऑगस्टला दिली आहे शाळेच्या मागे एका खाजगी शाळेचे बांधकाम झाले असून या बांधकामुळे प्रांगणातील पाणी