मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करतायत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद म्हणून मराठा माऊली मुंबईत पोहोचले. मात्र गेली दोन दिवसांपासून आंदोलकांची खाण्यापिण्या वाचून तारांबळ होती आणि त्या ठिकाणच्या परिसरातील हॉटेल्स बंद केल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर आता नगर जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव हे आंदोलनासाठी आलेल्या आपल्या सहकारी मित्रांसाठी घराघरातून भाकरी पोळी गोळा करून टेंपो भरून मुंबईला पाठवतायत.