शहरात आज १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या गटारोळ्यामुळे शहराचे वातावरण तणावग्रस्त झाले आहे. दोन प्रभावशाली सामाजिक कार्यकर्त्यांचे नातेवाईक व समर्थक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात शेकडो लोक सहभागी झाले होते. उबेद अली खान उर्फ भाईजान आणि हाजी निसार कुरेशी या दोन गटांमधील जुन्या वैमनस्याचा आज उद्रेक झाला. सुमारे आठ वाजता बाबुलाज चौकात असलेल्या हाजी निसार सेठ यांच्या पानमसाला दुकानावर मोठा जमाव धडकला. यानंतर सुरू झालेल्या मारामारीत दोन्ही बाजूंमध्ये तुफान हाणामारी झाली.