येथे उप कृषि अधिकारी स्तरावरील पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम वर्ग-3 घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भोजराज उईके यांनी भूषवले. कार्यक्रमाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर विपिन ब्राह्मणकर सर लाभले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी आकाश गेडाम साहेब यांनीही विविध योजना विषयी माहिती सांगितली. मंडल कृषी अधिकारी पवन मेश्राम साहेब यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, महाडीबीटी अर्ज वाढवणे, पिक फेरपालट बाबत माहिती सांगितली.