पंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे लाखो नागरिकांचे हाल होत असताना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. तब्बल ४० टन कांदा, ज्याची बाजार किंमत जवळपास पाच लाख रुपये इतकी आहे, पंजाबमधील फकवाडा गुरुद्वाराकडे रवाना करण्यात आला. येथून हा कांदा वेगवेगळ्या प्रांतातील पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. लासलगावच्या व्यापाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, व्यापारी वर्गाने आणखी मदतीची गाडी पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.