राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ऑटो सिस्टमवर होण्यासाठी प्रारूप तयार करावे, असे निर्देश आज बुधवारी दुपारी १ च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालये सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. स्थळबिंदू निश्चितीची २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक बृहत् आराखड्याची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.