शेंबा ते जयपुर रोडवर २६ ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणी करून गावाकडे जात असलेल्या अल्पवयीन मुलीला गाठत दोघांनी हमारे साथ चल म्हणून हात धरुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने २८ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून समीर खान जमील खान व शेहजाद खान विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.