मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी मिळविणे अधिक सोपे आणि कमी त्रासाचे झाले आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या कक्षाचा लाभ झाला असून दोन रुग्णांच्या जटील शस्त्रक्रियांसाठी कक्षाच्या निधीने मोठा दिलासा दिला आहे.