विरार- डोंगरपाडा परिसरात एका इमारतीच्या सदनिकेचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे. नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी डोंगरपाडा परिसरातील या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. संबंधित अधिकारी व नागरिकांची यावेळी आमदारांनी संवाद साधला व संपूर्ण घटनेचा व परिस्थितीचा आढावा घेतला.