धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील शेतकरी अजित रायते यांच्या पोल्ट्री फार्ममधून ३६ कोंबड्या चोरीला गेल्या. ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सोनगीर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गावातील सुभाष सोलखी (२८) याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या आतेभावाने मदत केल्याचे सांगितले. तो फरार असून, या घटनेमुळे ग्रामीण भागातील पशुधन चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.