आज दिनांक 8 सप्टेंबरला मांगलादेवी येथे अतिशय उत्साहात गणपती विसर्जन पार पडले. यावेळी गावातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार यावेळी गणपती विसर्जन रॅली दरम्यान पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी गणपती विसर्जन रॅलीत भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.