संगमनेर तालुक्यात तब्बल 14 तास मुसळधार पावसाने उध्वस्त शेती; शेतकरी-जनावरे संकटात संगमनेर तालुका : संगमनेर तालुक्यातील पिंपळनेर, जाखुरी, कनोली, कोळवाडे, अंभोरे, जोर्वे, खराडी, वाघापूर, डिग्रस, हंगेवाडी, गंगापूर आदी भागांमध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने जनावरांचा चारा पूर्णपणे भिजला असून शेतकरी उपाशी जनावरांकडे हताश नजरेने पाहत आहेत.