गणेशोत्सव जवळ येत असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी शांततेत व सुव्यवस्थेत सण साजरा करावा या उद्देशाने पोस्टे बल्लारपूर येथे 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पोलिस ठाण्यात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ४० ते ५० गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या