इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती आर्णी येथे शुक्रवारी दि.५ सप्टेबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आर्णीतील समस्त मुस्लिम धर्माचे नागरीक यात मोठा सहभाग होता. शुक्रवारी सकाळी आठ वाजता शहरातील सर्व मुस्लिम बांधव जामा मशीद समोर एकत्र झाले. तेथून मोहम्मद पैगंबर यांचा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. हि मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने फिरून मुबारक अली बाबा यांच्या दर्गेवर पोचल्यानंतर फुलांची चादर चढविण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी बालगोपालांसाठी मिठ