10 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सदर हद्दीतील आदिवासी नगर येथे राहणाऱ्या प्रीती मसराम या घराला कुलूप न लावता घराजवळ हनुमान मंदिरात पूजा करण्याकरिता गेले असता अज्ञात आरोपी नेत्यांच्या घरात प्रवेश करून 70 ग्रॅम सोने किंमत दोन लाख 80 हजार रुपये चोरून नेले. याप्रमाणे प्राप्त तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.