देवरुख साखरपा मार्गावर बुधवारी रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी केतकर यांच्यावर हा दरोडा टाकण्यात आला. मोर्डे खिंडीजवळ त्याचा ताबा घेत अज्ञात दरोडेखोराने त्याचे अपहरण करत त्यांना लुटले. त्यानंतर त्यांना वाटुळ जवळ सोडून पोबारा केला. या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.