ठाण्यातील राबोडी येथे मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची काही वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर आहे. मात्र आज दिनांक 24 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास या प्रकरणातील एक व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत मृत जमील शेख यांच्या कुटुंबाने माहिती दिली आहे. तसेच पोलिसांवर देखील आरोप केले आहेत. नजीब मुल्ला यांना अद्याप अटक का झाली नाही? असा प्रश्नही जमील शेख यांच्या कुटुंबाकडून केला जात आहे.