शिरसाट वज्रेश्वरी मार्गावर मांडवी परिसरात सार्वजनिक रस्त्यालगत ट्रकने राडाराडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली. खांडवी पोलिसांनी या प्रकरणी कारवाई जागामालक कुणाल मडवी, डंपर मालक अन्सार शेख, राडारोडा देणारा महेंद्र यादव, डंपरचालकाल अर्जुन सिंग व आणखी एक डंपर चालक अशा पाच जणांवर मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन डंपर देखील जप्त करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.