कंपनीच्या गेटचे कुलूप उघडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना चिखलीतील सोनवणेवस्ती येथील युनिक ग्रुप कंपनीत घडली. या प्रकरणी संदीपकुमार बाजिया (रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.