दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे आज रोटेशन पद्धतीने उपसरपंच भाऊसाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरती निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच मनीषा अनिल चारोस्कर यांच्या मार्गदर्शनाने उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळेस शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला .