चाकण येथे वाहतूक नियमन करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्कॉर्पिओ चालकाने धडक देऊन पळ काढला. वाहनावर पेंडिंग असलेला दंड भरण्यास सांगितल्याने चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना शनिवारी (३० ऑगस्ट) दुपारी आळंदी ते चाकण रोडवरील सिग्नलजवळ घडली.