संपूर्ण राज्यात लवकरच गणेश उत्सव सुरू होणारा असून त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सामाजिक संस्था च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत याच अनुषंगाने वाशिम येथील शेतकरी शेतकरी मनीष देशमुख यांनी गणेशोत्सवासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या कडे असलेल्या ५० देशी गाई आहेत त्या पासून ते दुग्धव्यवसाय करतात . या वर्षी त्यांनी गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.मागील वर्षी ६०० मूर्ती विक्रीतून त्यांना एक लाख रुपयांचा नफा झाला होता.