तालुक्यातील उंटावद गावात रविवारी ७ सप्टेंबर रात्री दोन गटात वाद उफाळुन आल्याने जातीवाचक शिवीगाळ करून हातांबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूने हल्ला करण्यात करण्यात आला.या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने अट्रोसिटी व खुनाचा प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.या घटनेमुळे उंटावद गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.